चालत्या ट्रेनचे छप्पर फाडून चोरले 5 कोटी...

आताचे चोरदेखील हायटेक झाले आहे. अलीकडे चोरांनी हायटेक प्रकारे 5 कोटी रुपये चोरी केले. तामिळनाडूमध्ये सलेमहून चेन्नईकडे जात असलेल्या ट्रेनच्या छप्परमध्ये भोक करून ही चोरी करण्यात आली.
 
चालत्या ट्रेनमधून केलेल्या या चोरी प्रकरणात चेन्नईमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पाठवण्यात येत असलेली 340 कोटी रक्कमातून पाच कोटी रुपये चोरी केले गेले. ट्रेन येथे पोहचल्यावर 226 पेटीमध्ये रोख ठेवलेल्या चार पेट्यांशी छेडछाड केल्याची बाब लक्षात आल्यानंतर आयजीपी एम रामसुब्रमणि यांनी सांगितले की पाच कोटी रुपये चोरीला गेले आहे.
 
तथापि, आरबीआयच्या एका अधिकार्‍याने सांगितले की ट्रेनहून 340 कोटी रुपय्यांचे जुने फाटके नोट 226 पेट्यांमध्ये सलेम ते चेन्नई पाठवल्या जात होते. पोलिसाने सांगितले रोखपेटीने भरलेल्या तीन मालवाहू कंटेनरमधून एकाचे एयरवेंट तुटलेले होते,  ज्याने चोरांनी वरून प्रवेश केल्याची शंका जाहीर केली जात आहे.

वेबदुनिया वर वाचा