उत्तर प्रदेशात तरुणींना मोबाइल वापरावर बंदी

बुधवार, 3 सप्टेंबर 2014 (10:43 IST)
उत्तर प्रदेशातील 'लव्ह जिहाद'च्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर एका सेवाभावी संस्थेने समाजातील विद्यार्थिनी तसेच तरुणींना मोबाइल वापरावर बंदी घातली आहे. तरुणींनी मोबाइलचा वापर करू नये,  असे आहावनही या संस्थेने केले आहे.  
 
अखिल भारतीय वैश्‍य एकता परिषदेने राज्यातील विद्यार्थिनी व युवतींना मोबाइल वापरावर बंदी घातली आहे. वैश्य समाजाची नुकतीच येथे बैठक झाली. केंद्रीय मंत्री कलराज मिश्रा यांच्यासह हजारो नागरिक यावेळी उपस्थित होते. राज्यातील सरकार एका विशिष्ट समाजाला विशेष सुविधा देत आहे, यामुळे आमच्या समाजातील युवतींना मोबाईल वापरण्यास बंदी घालणे जरूरी आहे, असे अध्यक्षांनी सांगितले. 
 
दरम्यान, राज्यातील युवतींनी मोबाईलचा वापर करू नये, असे खाप पंचायती व विविध संस्थांनी यापूर्वीच सांगितले आहे. मोबाईल व इंटरनेटच्या वापरामुळे युवती ‘लव्ह जिहाद‘च्या जाळ्यात फसण्याची जास्त शक्यता आहे.

वेबदुनिया वर वाचा