NIA च्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान वाझे ट्रायडंटमध्ये राहात होते. NIA नं हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज तपासलंय. सीसीटीव्हीमध्ये फुटेजमध्ये वाझे 16 फेब्रुवारीला वाझे इनोव्हा घेऊन हॉटेलमध्ये आले. तर 20 फेब्रुवारीला लँडक्रूझर प्राडोमधून ते हॉटेलच्या बाहेर गेले. दोन मोठ्या बॅगा घेऊन वाझे हॉटेलमध्ये जात असल्याचंही सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. एवढंच नव्हे तर वाझे बनावट आधारकार्ड तयार करुन दुस-याच नावावर ट्रायडंटमध्ये राहात होते. या आधार कार्डावर त्यांनी फोटो स्वतःचा लावला होता. मात्र नाव दुसरंच लिहिलं होतं.