राज्य सरकारचा निर्णय : बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा आता अनुत्तीर्ण शेरा नाहीच
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020 (09:18 IST)
12 वीच्या गुणपत्रिकेवरील 'अनुत्तीर्ण' शब्द काढण्याचा शालेय शिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी-मार्च 2020 च्या आणि जुलै-ऑगस्ट च्या पुरवणी परीक्षेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
दहावीपाठोपाठ आता बारावीच्या गुणपत्रिकेवरीलही ‘नापास’ (अनुत्तीर्ण) शेरा पुसण्यात आला आहे. त्यामुळे यंदापासून नापासऐवजी ‘पुनर्परीक्षेसाठी पात्र’ असा शेरा देण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेपासून तसेच जुलै-ऑगस्ट २०२० मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून त्याबाबतचा अध्यादेश गुरुवारी जारी करण्यात आला. विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे ही विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे.
१२ वीच्या गुणपत्रिकेवरील अनुत्तीर्ण शब्द काढण्याचा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय. फेब्रुवारी-मार्च २०२० च्या आणि जुलै-ऑगस्ट च्या पुरवणी परीक्षेपासून होणार अंमलबजावणी. pic.twitter.com/AJjBOR1LYw