मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील अंबरनाथ पश्चिम येथे शंकर हाईट्स इमारतीतील एका नवजात मुलीला इमारतीतून फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. शंकर हाईट्स इमारतीत रात्री बाळाचा जन्म झाला. जन्मानंतर त्याला इमारतीवरून खाली फेकण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सकाळी इमारतीतील रहिवासी बाहेर आले असता रहिवाशांनी इमारतीच्या डक्टमध्ये मुलगी पाहिल्यानंतर तातडीने स्थानिक नगरसेवक उमेश पाटील यांना माहिती दिली. पाटील यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून नवजात मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.