खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शुक्रवारी दुपारी भाईंदर शहरातील एका पॉश हॉटेलमध्ये छापा टाकण्यात आला. या छाप्यात एका चित्रपट निर्मात्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी चित्रपट निर्माता सोलोमन रत्नमाया आणि त्याचा सहकारी चंद्रराज उर्फ मिशेल डेव्हिड यांना अटक केली आहे.
पोलिसांनी छापा टाकताच हॉटेलमध्ये एकच गोंधळ उडाला. आरोपींनी हिंदी चित्रपट, टीव्ही मालिका, वेब सिरीज, फोटोशूट आणि यूट्यूब व्हिडिओमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींना जास्त कमाईचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. यानंतर मुलींना वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले.