अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने सात दिवसांच्या आत मराठी भाषेला प्राध्यान्य द्यावा अन्यथा मनसे स्टाईलनं समाचार घेतला जाईल, असा इशारा मनसेकडून देण्यात आला होता. ऑनलाईन रिटेल कंपन्यांनी दक्षिण भारतातील भाषांप्रमाणे महाराष्ट्रात मराठीत अॅप सुरु करावं, अशी मागणी करण्यात आली होती. यासाठी मनसे नेते अखिल चित्रे यांनी दोन्ही कंपन्यांच्या कार्यालयांना भेट देऊन खडे बोल सुनावले होते.
''ॲमेझॉनच्या डिजिटल सेवेत (Trading App) मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या आग्रही मागणीची ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस ह्यांच्या प्रतिनिधींनी दखल घेतली आहे. यासाठी अॅमेझॉनचं शिष्टमंडळ मुंबईत येत आहे. राजसाहेब म्हणतात तसं... तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम असाल तर जग तुमची दखल घेतं,'' असे मनसे नेते अखिल चित्रे यांनी ट्विट करत म्हटले आहे. याबाबत ॲमेझॉनकडून मेल आला असल्याची माहिती चित्रे यांनी दिली आहे.