ख्रिसमसच्या दिवशी मुंबईत ऑटो, टॅक्सी बंदची घोषणा

बुधवार, 23 डिसेंबर 2020 (10:58 IST)
ख्रिसमसच्या अर्थात २५ डिसेंबर  दिवशी मुंबईत ऑटो, टॅक्सी बंद करण्याची घोषणा केली आहे. जर राज्य सराकरने लवकरच ऑटो आणि टॅक्सी भाडेवाढ जाहीर केली नाही तर ख्रिसमस दिवशी मुंबईत भाजप पुरस्कृत संघटनेने ऑटो, टॅक्सी बंद ठेवण्याची हाक दिली आहे. माहिममधील नागरिकांच्या ग्रुप वाहतूक पोलिस आणि आरटीओकडे माहिम आणि आजूबाजूच्या भागातील काळी-पिवळी चालकांकडून धडक कारवाई करण्याची विनंती केली. त्यातील काही जण भाडेवाढ करण्याच्या बाजूने नसले तरी काही वाहन चालक आपल्या निर्णयावर ठाम आहे.
 
भाजप पुरस्कृत नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचे अध्यक्ष हाजी अरफत शेख म्हणाले आहे की, ‘भाडेवाढ करण्यासाठी आम्ही परिवहन विभागाकडे विनवणी करीत आहोत. ऑटो आणि टॅक्सीसाठी भाडेवाढी जाहीर करून पाच वर्ष झाली आहेत. इंधने (सीएनजी), विमा, कर, राहण्यासाठी खर्च आणि वाहनांच्या देखभालीची किंमत वाढली आहे. 
 
पण नागरी कार्यकर्ता इरफान माचीवाला म्हणाले की, ‘तो आणि त्यांचा ग्रुप मुंबईतील चुकीच्या टॅक्सी चालकांचा निषेध करीत आहे. त्यांनी भाडे नाकारली असून माहिम स्टेशन, हिंदुजा हॉस्पिटल, माटुंगा स्टेशन, लेडी जमशेदजी रोड आणि कॅडेल रोडी, अशी याबाबतील प्रकरणे आहेत. आम्हाला आरटीओ आणि वाहतूक पोलिसांना या वाहनचालकांना शिस्त लागवी अशी इच्छा आहे.’

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती