पोलिस दलामध्ये निष्ठेने सेवा करण्याची आपल्या घराण्याची परंपरा कायम ठेवणारे अशोक कामटे दहशतवाद्यांशी दोन हात करताना शहीद झाले. आक्रमता आणि धाडसाने त्यांनी आपली कारकिर्द गाजवली.
पोलिसअधिकारी म्हणून ते ज्या जिल्ह्यात गेले तेथील गुन्हेगारी मोडीत काढत त्यांनी जनसामान्यांकडून दाद मिळवली. सांगलीत खतरनाक गुंडाचा एन्कॉऊटर असो असो, अथवा परीणामाची काळजी न करता सोलापूरात आमदाराच्या घरात घुसून त्याच्यावर कारवाई करण्याचे धाडस कामटेंनीच करावे.
खैरलांजी प्रकरणानंतर उसळलेली दंगल आपल्या कौशल्याने अटोक्यात करण्याचे कौशल्याही त्यांनी दाखविले. शरीरयष्टीने राकट दिसत असले तरी मनाने तितकेच निर्मळ असणारे कामटे जेथे जातील तेथे आपले सहकारी आणि माध्यमांच्या प्रतिनिधींचा विश्वास संपादन करत असत. कोणत्याही कारवाईत सर्वात पुढे असणारे कामटे पोलिस क्रिडास्पर्धेसारख्या छोट्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन उत्साह वाढवायचे. ते स्वत: उत्तम वेटलिफ्टर होते.
पोलिसदलामध्ये सेवा करण्याची कामटे घराण्याची परंतरा आहे. त्यांचे आजोबा आणि वडीलांनीही पोलिस दलात निष्ठेने सेवा केली. ही परंपरा तेवढ्याच निष्ठेने आपल्या खांद्यावर घेणा-या अशोक कामटेंनी या परंपरेला कधील धक्का लागून दिला नाही. सांगली, सोलापूर, ठाणे ग्रामीण येथे पोलिस अधिक्षक म्हणून कारकिर्द गाजविल्यानंतर याच कामाची दखल घेऊन त्यांची एटीएस आयुक्तपदी निवड झाली होती. आक्रमक पोलिस अधिकारी म्हणून ओळख असणारे कामटे बुधवारी गिरगांव येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्यावेळीही तेवढ्याच तत्परतेने सर्कीय होते. दहशतवाद्यांशी दोन हात करताना ते शहीद झाले. शेवटच्या श्वासापर्यंत तेवढ्याच आक्रमतेने झुंज देणा-या सच्या देशभक्ताला मानाचा सलाम.