Kanda Kachori : जयपूरची प्रसिद्ध कांदा कचोरी घरीच तयार करा, रेसिपी जाणून घ्या

शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2023 (21:51 IST)
Kanda Kachori : भारत आपल्या विविधतेसाठी ओळखला जातो. येथे प्रत्येक राज्याचे स्वतःचे विशिष्ट प्रकारचे खाद्य पदार्थ आहे.कधी जयपूरला गेला असाल तर तुम्ही कांदा कचोरी खाल्ली असेल. ही खास कचोरी जो कोणी एकदा खाईल तो त्याची चव विसरू शकणार नाही.आपण घरीच कांद्याची कचोरी बनवू शकता.चला साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
 
साहित्य-
1.5 कप बेसन
1.5 कप मैदा 
2 मोठे कांदे
2-3 हिरव्या मिरच्या पानांसह चिरल्या
बारीक चिरलेले आले
कोथिंबीर 
1/2 टीस्पून ओवा 
1/2 टीस्पून हिंग
1/2 टीस्पून मीठ
1/2 टीस्पून लाल तिखट
1/2 टीस्पून गरम मसाला
1/2 लहान लसूण पाकळ्या
1/2 टीस्पून  बडीशेप 
 
कृती :
सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात मैदा, बेसन, मीठ आणि ओवा घाला. यानंतर, हे सर्व साहित्य चांगले मिसळा.
आता थोडे थोडे पाणी घालून बेसन मळून तयार करा आणि थोडा वेळ बाजूला ठेवा. थोडा वेळ ठेवल्यानंतर सारण तयार करा.  
कांदा कचोरी चे सारण तयार करण्यासाठी तेल गरम झाल्यावर त्यात जिरे,बडीशेप आणि चिमूटभर हिंग घालून परतून घ्या. यानंतर कढईत चिरलेला कांदा घाला आणि कांदे सोनेरी होईपर्यंत शिजवा,
त्यानंतर कांद्यामध्ये आल्याची पेस्ट आणि चिरलेली हिरवी मिरची घालून आणखी काही वेळ परतून घ्या. व्यवस्थित परतल्यावर थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. वर कोथिंबीर जरूर टाका.
सारण थंड झाल्यावर पिठाचा एक गोळा घेऊन हलका रोल करा. यानंतर त्यात कांद्याचे सारण भरून चारही बाजूंनी दाबून बंद करा. शेवटी, ते सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. हिरव्या कोथिंबिरीच्या चटणीसोबत सर्व्ह करा 
 










Edited by - Priya Dixit 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती