कैरीची डाळ

बुधवार, 25 मार्च 2015 (12:28 IST)
साहित्य: दोन वाट्या चण्याची डाळ, पाच हिरव्या मिरच्या, ओले खोबरे, कोथिंबीर, 1 लहान कैरीचा कीस, मीठ, साखर, फोडणीचे साहित्य.
 
कृती: चण्याची डाळ चार तास भिजत घाला. नंतर डाळ मिरच्या घालून वाटून घ्या. एका कढईत फोडणी करून त्यात वाटलेली डाळ घाला आणि वाफ आणा. वाफ आल्यावर कैरीचा कीस, चवीप्रमाणे मीठ आणि साखर घाला आणि पुन्हा वाफ आणा. सर्व्ह करताना खोबरे व कोथिंबीर घाला. चवीप्रमाणे हवं असल्यास डाळ वाटताना त्यात लसण्याच्या 4-5 पाकळ्याही वाटू शकता.

वेबदुनिया वर वाचा