आंब्याचा पेडा बनवण्यासाठी प्रथम कढईत तूप घेऊन गरम करा. आता कंडेन्स्ड मिल्क आणि मिल्क पावडर मिक्स घालून घट्ट होईपर्यंत शिजवा. शिजवताना गॅस कमी करावा, नाहीतर जळतो. नीट शिजल्यावर ताटात काढा. आता दुसर्या पॅनमध्ये तूप गरम करून त्यात कैरीची प्युरी, केशर आणि वेलची पूड घालून चांगले शिजवून घ्या. ते शिजल्यावर त्यात आधी शिजवलेले कंडेन्स्ड मिल्क आणि मिल्क पावडर मिसळा.