ऊसाच्या रसातील पोळी

ND
साहित्य : 2 ते 3 वाटी कणीक, दीड ते 2 वाटी ऊसाचा रस, 1 वाटी गूळ, अर्धा चमचा वेलची पूड, मोहनासाठी तूप 2 लहान चमचे. (ऊसाच्या रसामध्ये गूळ भिजत ठेवा).

कृती : एका भांड्यात कणीक घेऊन तुपाचे कोमट मोहन घाला, चिमटीभर मीठ घाला. ऊसाच्या रसामध्ये गूळ विरघळून घ्या. त्यातच विलायची पूड घाला व कणकेमध्ये थोडे थोडे घालत कणीक मळून घ्या. पंधरावीस मिनिटे भिजू द्या. करताना थोड्या तुपाचा हात घेऊन लाट्या करा व घडीच्या पोळ्या करून गरम तव्यावर तूप लावून भाजून घ्या. ह्या पोळ्या नवीन चव असल्यामुळे मुलांबरोबर वृद्धांना खूप आवडते.

वेबदुनिया वर वाचा