पाऊस

ND
किती पहावी मी वाट
असाची येतो पाऊस
साता जन्मांची अशी
माझी पुरविण्या हौ

कधी पडे तो अखंड
कधी जरा ना टिपुस
असा खेळी लपंडाव
माझा प्रेमळ पाऊस

कधी बनतो खट्याळ
कधी पडे सोसाट्यात
जशी नभातून व्हावी
शुभ्रमोत्यांची बरसात

त्याचे झेलिता तुषार
काया मोहरुनी जावी
मग नभातील वीजही
नसानसांतून खेळावी

लक्षलक्ष हे बीजांकुर
असे फुटावे झाडाला
जसे सारे पडून उरावे
जळ सोसेना मातील

असा हे वेडा उनाड
कधी वागे छान नीट
हळूवार मग दोन थेंब
देई रित्या ओंजळीत

असा लबाड पाऊस
क्षणभर तरी थांबावा
चिंब भिजले चराचर
मग घेतील विसावा

मोरपिसा स्पर्शासमान
त्याचा फिरताना हात
स्वर्गातून खाली यावा
कुणी दिव्यतेज देवदूत

वेबदुनिया वर वाचा