बायका नवर्‍याशी भांडताना कशा धमक्या देतात!

शुक्रवार, 1 ऑगस्ट 2014 (18:33 IST)
1) पायलटची बायको:- जास्त उडू नका!

2) टिचरची बायको:- मला शिकवू नका!

3) पेंटरची बायको:- थोबाडच रंगवीन!
 


4) धोब्याची बायको:- चांगली धुवून टाकीन!

5) नटाची बायको:- कशाला उगाच नाटक करता!

6) दंत वैद्याची बायको:- दात तोडून हातात देईन!

7) सी. ए. ची बायको:- हिशोबात रहा!

8) विज कर्मचार्‍याची बायको:- माहीत आहे किती दिवे लावलेत!

9) इंजिनिअरची बायको:- सर्किट ढिले करून टाकीन!

10) वकिलाची बायको:- आता तूमचा निकालच लावते!

11) किराणा दुकानदाराची बायको:- जास्तीच्या पुड्या बांधू नका!

12) चक्की वाल्याची बायको:- बारीक पीठच करून टाकीन!

13) दुधवाल्याची बायको:- उगाच जास्त पाणी टाकू नका!  

वेबदुनिया वर वाचा