कॉफीची उत्कृष्ट चव आणि सुगंध अनुभवायचा असेल तर कॉफी बीन्सच्या मदतीने ताजी कॉफी तयार करणे चांगले मानले जाते. म्हणूनच बहुतेक लोक कॉफी बीन्स वापरतात. पण ते जास्त काळ ताजे ठेवणंही खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा लोक ते चुकीच्या पद्धतीने संग्रहित करतात, कॉफी बीन्स दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी या टिप्स अवलंबवा.
फ्रिज मध्ये ठेऊ नका
बऱ्याचदा असे दिसून येते की कॉफी बीन्स जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी लोकांना ते फ्रिजमध्ये ठेवायला आवडते. परंतु कॉफी बीन्स स्पंजसारखे असतात, त्यांच्या सभोवतालचा कोणताही गंध शोषून घेतात. अशा परिस्थितीत फ्रीजमध्ये ठेवल्यास तिथे ठेवलेल्या इतर गोष्टींचा वास त्यात शोषला जातो आणि मग कॉफीची चव खराब होते. म्हणून, कॉफी नेहमी रेफ्रिजरेटरपासून दूर कोरड्या जागी हवाबंद डब्यात ठेवा.
काचेच्या भांड्यात साठवू नका
कॉफी बीन्स काचेच्या जारमध्ये ठेवण्याचे टाळावे. काचेचे भांडे पारदर्शक असतात आणि म्हणून जेव्हा त्यामध्ये कॉफी साठवली जाते तेव्हा ते लवकर खराब होतात. म्हणून, कॉफी साठवण्यासाठी अशा जार वापरण्याचा प्रयत्न करा, जे पारदर्शक नाहीत. त्याच वेळी, आतमध्ये हवा येऊ नये म्हणून जारमध्ये हवाबंद सील असावा. हवेमुळे ऑक्सिडेशन होते, ज्यामुळे चव खराब होते.
साठवायची योग्य पद्धत जाणून घ्या
कॉफी बीन्स जास्त काळ ताजे ठेवायचे असेल तर तुम्हाला ते योग्यरित्या कसे साठवायचे हे माहित असले पाहिजे. एका मोठ्या कंटेनरऐवजी लहान हवाबंद डब्यात साठवा.