* बटाटावडा बनवताना बेसनाच्या घोळात जरासं गव्हाचं पीठ टाकावं. आणि तळताना खूप लाल होण्यापूर्वीच काढून घ्यावे. याने वडे तेलकट होत नाही.
* पोळ्या नरम आणि ताज्या हव्या असल्यास पोळ्यांच्या कॅसरोलमध्ये आल्याचे तुकडे ठेवावे.
* एकदा वापरलेलं तेल पुन्हा वापरण्यासाठी आधी त्याला मंद आचेवर ठेवावं. त्यात आल्याचे तुकडे टाकवे. थोड्या वेळाने वापरावे. तेलाचा जळका वास दूर होतो.
* तांदूळ खालून लागून गेले असल्यास ते आच बंद करून त्यावर दोन ब्रेडचे तुकडे ठेवून द्यावे. याने भाताचा जळका वास दूर होईल.
* सुपामध्ये मीठ जास्त झाल्यास अर्धा बटाटा सोलून त्यात सोडावा. बटाटा अतिरिक्त मीठ शोषून घेईल. तसंच वरणात मीठ किंवा एखाद्या भाजीत मीठ जास्त झाल्यास त्यात भिजलेल्या गव्हाच्या पिठाचा गोळा करून सोडून द्यावा. मीठ शोषले जाईल.
* भजी क्रिस्पी बनवायची असतील तर त्यात जरासे कॉनफ्लोअर किंवा तांदळाचं पीठ टाकावे.