जिंदगीच्या गाडीचे पण बदलत असतात gear....

शुक्रवार, 6 जानेवारी 2017 (15:25 IST)
नववर्षाच्या स्वागताचा उत्साह वाढवणारी , सोप्या शब्दात तुमच्या  मनावर " आपले पणाची फुंकर घालणारी " प्रा. विजय पोहनेरकर यांची हलकी-फुलकी कविता ......!!
 
" Happy New Year 
  मित्रा  Happy New Year  "
 
राग नको लोभ नको 
नको Tension Dear 
कुणाचाच Hate न करता 
घ्यावी खूप Care 
Happy New Year 
मित्रा Happy New Year
 
नाती गोती जपून ठेवा 
भावना करा Share 
बोलून दुःख हलकं करा 
ओघळूद्या  Tears 
Happy New Year
मित्रा Happy New Year 
 
अभ्यास करा मेहनत करा 
शिक्षण घ्या Higher 
नौकरी असो , बिझनेस असो 
घडवा उत्तम Career
Happy New Year 
मित्रा Happy New year 
 
व्यसनामुळे कधीच कुणाचे 
भले नाही झाले 
शेती-बाडी बंगला गाडी 
सारे काही गेले 
नको पत्ते , नको दारू 
नको रोज Beer 
Happy New Year 
मित्रा Happy New Year
 
शौक झोक करा पण 
वाया नका जाऊ 
कसंही वागून घरच्यांना 
दुःख नका देऊ 
कुठं थांबायचं कळलं पाहिजे 
Show नको  Poor 
Happy New Year 
मित्रा  Happy New Year 
 
आई-वडील , बहीण-भाऊ 
हेच कामी येतील 
शेजारी आणि मित्रच तुला 
खरी साथ देतील 
सर्वांशी गोड बोलून 
या सगळे Near
Happy New Year 
मित्रा Happy New Year
 
घडायचे ते घडत असते 
नको चिंता करू 
छोट्या छोट्या गोष्टीवरून 
राग नको धरू 
जिंदगीच्या गाडीचे पण 
बदलत असतात gear 
Happy New Year 
मित्रा Happy New Year

वेबदुनिया वर वाचा