पळवा डोकेदुखी....

डोकेदुखी प्रचंड तापदायक ठरते. महत्वाच्या कामादरम्यान डोकेदुखी उद्भवली की काहीही सुचत नाही. डोकेदुखीवर वेदनाशामक औषधं किंवा प्रतिजैविकं घेण्याऐवजी काही घरगुती उपाय करून बघता येतील. 
 
* आल्यामुळे डोक्यतल्या रक्तवाहिन्यांना आराम मिळतो. वेदना कमी होतात. त्यामुळे डोकं दुखत असेल तर आल्याचा चहा किंवा काढा प्यावा. आलं आणि लिंबांचा रस सम प्रमाणात घेऊन हे मिश्रण प्या. 
 
आलेपूड किंवा आलं पाण्यात उकळून ते पाणी प्या. 
 
* डोकेदुखीवर दालचिनी प्रभावी ठरते. दालचिनीची पूड करून त्यात पाणी घाला. जाडसर पेस्ट तयार करा. कपाळावर लावा. डोळे बंद करून अर्धा तास लेटून राहा. कोमट पाण्याने धुवून टाका. आराम मिळेल. 
 
* लवंग नैसर्गिक वेदनाशामक आहे. लवंग थंडावा देते. लवंगांची पूड करून रूमालात बांधा. डोकेदुखी उद्भवली की लवंगाचा वास घ्या. आराम मिळेपर्यंत ही कृती करत राहा. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती