हिवाळ्यात डिओ किंवा परफ्यूम? जाणून घ्या

सामान्यतः: शरीराची दुर्गंध घालवण्यासाठी आणि फ्रेश फील करण्यासाठी डिओडरेंट किंवा परफ्यूम वापरलं जातं. परंतू बदलत असलेल्या मोसमाप्रमाणे यातही काही बदल करण्याची गरज असते. जाणून घ्या हिवाळ्यात काय वापरले पाहिजे ते:
 
हिवाळ्यात त्वचा ड्राय होऊन जाते आणि त्वचेत आर्द्रतेचा अभाव असतो ज्यामुळे अनेकदा त्वचा फाटू लागते. अशात असे कोणतेही उत्पाद ज्याने केमिकलचा त्वचेवर परिणाम होत असेल, वापरणे हानिकारक ठरेल. ड्राय त्वचेवर डिओ किंवा परफ्यूम वापरल्याने जळजळ होऊ शकते किंवा त्वचेवर विपरित परिणाम पडू शकतो. म्हणून नॅचरल डिओ किंवा मिस्ट वापरणे योग्य ठरेल.
आपण घरी सुवासिक फुलांनी तयार केलेले नॅचरल अत्तर किंवा डिओ वापरू शकता. अंघोळीच्या पाण्यात गुलाब, मोगरा किंवा चमेलीच्या फुलांचा पाकळ्या मिसळून या पाण्याने स्नान करावे. किंवा पाण्यात गुलाबपाणी टाकून अंघोळ करू शकता. अशाने आपल्या परफ्यूमची गरज भासणार नाही आणि दिवसभर ताजेतवाने वाटेल.

वेबदुनिया वर वाचा