स्मरणशक्ती, दुबर्लता तसेच दृष्टीदोष दूर करण्यासाठी निसर्गाची देणगी असलेले लालबुंद सफरचंद आपल्या आरोग्य रक्षकाची भूमिका बजावत असते. आजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला काही दिवसातच बरे वाटते. तसेच अशक्तपणा आल्यानंतर दररोज सकाळ- सध्याकाळ कच्च्या सफरचंदची भाजी व पोळी खायला द्यावी. अशक्तपणा कमी होऊन ताजेतवाने वाटते.