ऍसिडिटीच्या त्रासाला दूर करण्यास कारागार आहेत हे ऍक्युप्रेशर पॉइंट्स

मंगळवार, 14 जुलै 2020 (09:15 IST)
ऍसिडिटी एक सामान्य त्रास आहे. बऱ्याचशा लोकांनी हे कधी न कधी तरी हे अनुभवले असणारच. यामध्ये पोटातील अम्लीय तत्त्व अन्न नलिकेत येतं. जेणे करून घशात, छातीत, पोटात जळजळ, कोरडा खोकला, ढेकर, पोट फुगणे या सारखे लक्षणे दिसू लागतात. ऍसिडिटीचे वेळेतच उपचार केले गेले नाही तर यामुळे इतर गंभीर त्रास उद्भवू लागतात, जसे की अन्न नलिकेचा अल्सर, आतड्यांवर आपले दुष्प्रभाव टाकणारे 'इरिटेबल बाउल सिंड्रोम' इत्यादी.
काय आहे ऍसिडिटीचे घटक ?
 
अवेळी जेवण करणे, तिखट आणि आंबट खाणं, जास्त गरम जेवण घेणं, धूम्रपान करणं, अनियमित दिनचर्या असणं, काळजी, अन्नाला कमी चावणं, पाणी कमी पिणे, नकारात्मक विचार ठेवणे, बाहेरचे जिन्नस जास्त वापरणे, व्यायामाचा अभाव हे सर्व ऍसिडिटी वाढविण्याचे घटक आहेत.
 
ऍक्युप्रेशर चिकित्सा पद्धतीद्वारे खूपच सोप्या पद्धतीने ऍसिडिटीच्या त्रासाला मुळापासून नाहीसे करता येतं. पचन संस्थेचे अवयव जठर, आंतड्या, प्लीहा(स्प्लिन), यकृत, अन्ननलिका या सर्वांच्या क्रियेला सामान्य केले जाते. जेव्हा या साऱ्या अवयवांची ऊर्जा व्यवस्थितरीत्या असते तेव्हा अम्लीय तत्त्व अन्न नलिकेत येतं नाही. या साठी काही ऍक्युप्रेशर पॉइंट्स आहे, ज्यांचा साहाय्याने ऍसिडिटी झाल्यास लाभ मिळवता येतं.
 
* CV 6 - हे पचनाशी निगडित पॉइंट बेंबीच्या 1 इंच खाली नाजूकपण विशेष पॉइंट आहे. दिवसातून दोन ते तीन वेळा हळुवार तळहाताने 1 मिनिटे मॉलिश करावी.
* P6 - आतील अवयवांची जळजळ, उलट्या, उचक्यांपासून आराम देणारा हा पॉइंट मनगटापासून 2 इंच खाली असतो. या पॉइंटची दोन बोट्यांच्या साह्याने हळुवार मॉलिश करावी.
* ST 36 - गुडग्यापासून चारबोट खाली मध्यात हे पॉइंट आहे. जरा जास्त वेगाने या पॉइंटवर 20 सेकंदा पर्यंत किमान 3 वेळा मॉलिश करावी. अपचनापासून त्वरित आराम मिळेल.
* LV 3 - अम्लीय स्त्रावाला नियंत्रित करणाऱ्या या पॉइंट ला घड्याळीच्या दिशेने किमान 10 वेळा आणि त्याचा उलट दिशेने 10 वेळा चोळणे किंवा मॉलिश करणे  मदतगार ठरेल.

टीप : लक्षात असू द्या : नियमित दैनंदिनी, हलकं जेवण, काळजीपासून बचाव, नारळ पाणी, गुलकंद, वेलची या सारखे थंड असणारे पदार्थ आराम देतात. शीतली शीतकारी प्राणायामाच्या अभ्यासाने देखील आम्लपित्त कमी होतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती