नवरात्रीत उपवास करतं असाल तर हे वाचा...

नवरात्र सणाची धूम वेगळीच असते. काही लोकं यात भरपूर खातात तर काही नऊ दिवस उपवास करतात. हा काळ ऋतुबदलाचा मानला जातो. त्यामुळे या दिवसात शरीराची प्रतिकारशक्ती आणि पचनशक्ती कमी होते. याच कारणामुळे या काळात उपवासाची पद्धत आहे. तरीही या काळात पूर्णपणे उपाशी न राहता आरोग्यदायी पदार्थ खाणं गरजेचं आहे. म्हणूनच सादर आहे काही टिप्स


 
* बराच वेळ उपाशी राहिल्याने अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. म्हणून पूर्णवेळ उपाशी राहू नये. थोड्या थोड्या वेळाने सुका मेवा खावा. याने दमल्यासारखं वाटणार नाही. 

पाणी, फळांचा ज्यूस, लिंबू पाणी, कोकम सरबतं, नारळांचं पाणी व इतर द्रव पदार्थ भरपूर मात्रेत घ्या.
 

* आवश्यक पोषक घटकांपासून शरीराला वंचित ठेवू नका. उपवासात काळं मीठ खाणं योग्य असतं. या मिठात भरपूर प्रमाणात पोटॅशियम असल्याने पचनक्रिया सुधारून पोटात वायू धरत नाही.
 
साबुदाणा ऊर्जादायक पदार्थ आहे म्हणून त्यात बटाटा, दुधी किंवा उपवासाला चालणार्‍या इतर भाज्या घालून पॅटिस करू शकता. तळण्याऐवजी पॅटिस शॅलो फ्राय करू शकता.


* राजगिर्‍याचं पीठ दुधासोबत खाणे योग्य राहील. राजगिर्‍यातून प्रथिनं मिळतात.
 
शिंगाड्याच्या पिठाने पचनक्रिया सुधारते. याने रक्तामधील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं.


* भगर जीवनसत्त्वांचा उत्तम स्रोत आहे. पचण्यास अत्यंत हलका असून याची चव तांदळाप्रमाणे असते. भगर आमटीसोबत खाता येते.
 
उपवास करत नसला तरी या वेळी उष्ण पदार्थ टाळा. जसे जेवणात कांदा-लसूण आणि इतर उग्र पदार्थ सामील
करणे टाळा. त्याऐवजी ताक, दही, फळं, दूध हे भरपूर मात्रेत खा.


वेबदुनिया वर वाचा