गोंगाटापासून दूर राहणे हृदयरोग्यांसाठी उत्तम

लंडन- जर तुम्ही अत्यंत गोंगाट असलेल्या परिसरात राहत असाल तर आताच सावधान. कारण, शास्त्रज्ञांच्या मते आवाज असलेल्या अत्यंत रहदारीच्या अरूंद गलल्या, कसबे व मोहल्ले अशा ठिकाणी राहणार्‍या लोकांना हृदयसंबंधीच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. युनायडेट किंगडममधील नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी यासंबंधीचे संशोधन केले आहे.
 
संशोधनात त्यांना असे आढळून आले की सातत्याने होणारे मोठे आवाज हे आपल्या हृदयावर परिणाम करतात. हे आवाज जरी कमी तीव्रतेचे असले तरी त्यांचा प्रतिकूल प्रभाव हृदयाच्या ठोक्यांवर पडतो. भारतातील काही शहरांत ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण निर्धारित प्रमाणपेक्षा जास्त आहे. तेथे हृदयविकार संबंधीच्या समस्याही जरा जास्तच जाणवतात. आवाजामुळे हृदयाच्या ठोक्यांवर विपरित परिणाम होतो.

वेबदुनिया वर वाचा