नेक्रोझोस्पेर्मियावर आयव्हीएफ द्वारे कशी देता येईल मात?

सोमवार, 29 ऑगस्ट 2022 (22:01 IST)
नेक्रोझोस्पेर्मिया अवस्थेला वैद्यकीय भाषेमध्ये नेक्रोस्पेर्मिया असे देखील संबोधले जाते, ह्या स्थितीमध्ये पुरुषांच्या ताज्या वीर्य नमुन्यात मृतजन्य शुक्राणु आढळून येतात. नेक्रोझोस्पर्मिया ही एक दुर्मिळ स्थिती असून, केवळ ०.२ टक्के ते ०.५ टक्के वंध्य पुरुषांमध्ये ही समस्या आढळून येते.
नेक्रोझूस्पर्मिया समस्येचे वर्गीकरण :
मध्यम - ५० ते ८० टक्के मृत शुक्राणू
गंभीर - ८० टक्क्यांहून अधिक मृत शुक्राणू
नेक्रोझूस्पर्मियावर केले जाणारे अचूक निदान या समस्येच्या निवारणाचा सर्वोत्तम उपाय आहे.
नेक्रोझूस्पर्मियाची कारणे
नेक्रोझूस्पर्मिया होऊ शकणारे घटक खालीलप्रमाणे:
 उत्पादक मार्गात संसर्ग
 हार्मोनल असंतुलन
 मणक्याची दुखापत
 शरीराचे असामान्य तापमान
 टेस्टिक्युलर कर्करोग
 केमोथेरपी आणि रेडिओथेरपी
 अंडकोष समस्या
 दीर्घ कालावधीसाठी लैंगिक संयम
 एंटी स्पर्म एंटी बॉडी
 एपिडिडायमिसची समस्या
 ताणतणावाची औषधे आणि नियमित अल्कोहोलचे सेवन
निदान कसे केले जाते?
नेक्रोझूस्पर्मियाचे निदान करण्यासाठी, काही चाचण्या कराव्या लागतात, त्यात खालील गोष्टींचा समावेश असतो:
 इओसिन टेस्ट
 हायपो-ऑस्मोटिक फ्लॅगेलर कॉइलिंग टेस्ट
 स्पेशलाइज्ड स्पर्म फंक्शन टेस्ट
 पुरुष संप्रेरक चाचणी
 गुणसूत्र विश्लेषण
बहुतेकदा नेक्रोझूस्पर्मिया आणि अस्थिनोझोस्पर्मियामध्ये गोंधळ उडतो, अस्थिनोझोस्पर्मिया ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये शुक्राणू गतिहीन असतात परंतु मृत नसतात. अस्थिनोझूस्पर्मियाचे निवारण करणे सोपे आहे, कारण हायपोस्मोटिक स्वेलिंग टेस्ट सारख्या अत्याधुनिक चाचण्या वापरून जिवंत शुक्राणूंची ओळख पटल्यानंतर ICSI करता येऊ शकते त्यामुळे, या दोन्ही स्थितीचे योग्य निदान आणि उपचार प्राप्त करण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी बोलणे आवश्यक आहे.
 
आणखीन एक भेडसावणारी दुसरी समस्या म्हणजे काहीवेळा याचे निदान चुकीचे लागू शकते. असे चुकीचे निदान परीक्षणादरम्यान केल्या जाणाऱ्या खालील गोष्टींमुळे घडून येतात :
 जेव्हा, शुक्राणूनाशक क्रीमने लेपित कंडोममध्ये शुक्राणू गोळा केले जातात.
 जेव्हा, शुक्राणू निर्जंतुक असलेल्या कंटेनरमध्ये गोळा केले जातात.
 शुक्राणू गोळा करण्यासाठी वापरले जाणारे वंगण शुक्राणूनाशक असल्यामुळे सर्व शुक्राणू नष्ट होतात.
चुकीचे निदान टाळण्यासाठी काय करावे?
वीर्य विश्लेषणासाठी शुक्राणूंचे नमुने गोळा करण्यासाठी खास गैर-विषारी सिलास्टिक कंडोमचा वापर केल्यास सोईस्कर होईल.
वीर्य विश्लेषण चाचणीमध्ये नेक्रोझूस्पर्मियाचे निदान झाल्यास, तुमच्या जवळच्या विश्वासार्ह प्रयोगशाळेतून या चाचणीची
फेरतपासणी करा.
 जिवंत शुक्राणू आणि मृत शुक्राणू अचूक ओळखण्यासाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञ अनुभवी असणे आवश्यक
आहे.
 इओसिन-निग्रोसिन सारखे विशेष सुप्रविटल स्टेन्स वापरून विशेषज्ञ चाचणी सफल करू शकतात. .
 या चाचण्या योग्य रीतीने केल्या पाहिजेत, म्हणूनच निदानाची पडताळणी करण्यासाठी अॅन्ड्रोलॉजी लॅब
हे एक महत्वपूर्ण ठिकाण आहे.
 पहिल्या वीर्याच्या १ तासानंतर दुसरा वीर्य नमुना घेतला जातो. हे वीर्य ताजे असल्यामुळे, पहिल्या
सॅम्पलमध्ये जर जिवंत शुक्राणू न आढळ्यास दुसऱ्या वीर्य नमुन्यात जिवंत शुक्राणूचा समावेश असतो.
 शुक्राणूमधील गोळ्याची तपासणी करण्यासाठी वीर्य नमुना प्रयोगशाळेत सेंट्रीफ्यूज करणे आवश्यक आहे.
उपचार पर्याय काय आहेत?
जेव्हा नेक्रोझूस्पर्मियाचे निदान कळून येते, तेव्हा सर्वात आधी या समस्येचे अचूक कारण शोधून काढता आले पाहिजे. कोणत्या प्रकारचा संसर्ग झाल्यास एंटिबायोटिक द्वारे ते नियंत्रित केले जाऊ शकते. तसेच जर नेक्रोझूस्पर्मिया ड्रग्सच्या गैरवापरामुळे होत असेल तर डॉक्टर ड्रग व्यसनमुक्तीचा उपचार सुचवू शकतात.
नेक्रोझूस्पर्मिया असलेल्या लोकांमध्ये गर्भधारणेचा दर कमी असतो. ICSI द्वारे गर्भधारणेची शक्यता सुधारता येते.
टेस्टिक्युलर स्पर्म एक्सट्रॅक्शन (TESE-ICSI)सह IVF हा नेक्रोझूस्पर्मियाच्या बाबतीत सर्वोत्तम उपचार पर्याय आहे. या प्रक्रियेदरम्यान अंडकोष सुन्न करण्यासाठी तुमचे डॉक्टर भूल देतील, त्यानंतर थोड्या प्रमाणात ऊती बाहेर काढून टाकण्यासाठी वृषणात सुई घातली जाते.
वीर्य स्खलनमध्ये जिवंत शुक्राणू पेशी आढळत जरी नसले, तरी अनेकदा अंडकोषांमध्ये ते आढळून येतात.
हे शुक्राणू स्वतःहून अंड्यात प्रवेश करू शकत नाहीत आणि फलित करू शकत नाहीत. त्यामुळे ICSI सह IVF आवश्यक आहे.
येथे, तुमचे डॉक्टर अंडी थेट शुक्राणूसह इंजेक्ट करतील. नेक्रोझूस्पर्मियावर TESE-ICSI सह, यशाचा दर जास्त आहे.
शिवाय, वरील सर्व प्रजनन उपचार अयशस्वी झाल्यास शुक्राणू दाता किंवा इतर कौटुंबिक पर्यायांचा विचार करणे ही सर्वोत्तम पुढील पायरी असू शकते.
Dr Hrishikesh Pai

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती