डोकेदुखी: सर्दीपासून कॅन्सरपर्यंत

शरीरावर नियंत्रण ठेवणारा मेंदू हा डोक्यात अनेक आवरणे तसेत हाडांमध्ये झाकलेला असतो. डोकेदुखीचा उगम डोळ्यांच्या हाडापासून पोकळीपर्यंत ‍आणि मेंदूच्या आवरणापासून कान, डोळे ते तोंडापर्यंत अनेक प्रकाराने होऊ शकतो.

WD
सर्दीपासून डोकेदुख
डोळ्याच्या पुढील भागात डोक्यावर, गालाखाली अनेक पोकळ्या असतात. सर्दी जाड झाल्यावर काही वेळेस ती या पोकळ्यांमध्ये जाऊन बसते. विशेषत: डोळ्यांच्या वरील पोकळीत सर्दी गेली तर नाक शिंकरून ती बाहेर येत नाही व त्यामुळे सायनसायटीसचा त्रास सुरू होतो. सकाळी डोक्याच्या ह्या भागात ठणके सुरू होतात व दुपारपर्यंत ह्या कळा असह्य होतात. दुपारनंतर थोडे बरे वाटते व पुन्हा दुसर्‍या दिवशी सकाळी डोकेदुखी सुरू होते. नाकातील पडदा वाकडा असलेल्या व्यक्तींना जास्त त्रास होतो. काही वेळेस ह्या पोकळीतील सर्दी छोट्या शस्त्रक्रियेने काढून नाकाचा पडद्याचा वाकडा भाग काढला जातो.

WD
मायग्रेन
अतीतामुळे किंवा अचानक डोक्यावर ताण आल्यास तीव्र डोकेदुखी सुरू होऊ शकते. त्यानंतर उलट्याही सुरू होऊ शकतात. मायग्रेनचा आजार काही वेळेस अनुवांशिकही असतो.

WD
कानाचा विकार
काही वेळेस सर्दीमुळे किंवा कानात कोणतीही व्याधी झाल्यास प्रथम कान दुखू लागतो व त्यानंतर हळूहळू डोकेदुखी वाढून ताप येणे व चक्कर येणे सुरू होते. कानामध्ये कधी कधी मळ साठला तरीही डोकेदुखी होते.

WD
डोळ्यांचे विका
साधे डोळे येण्यापासून अनेक करणांनी डोळ्यांपासून डोकेदुखी सुरू होते. डोक्यातील नेत्रपटल सरकला किंवा डोळ्यावरील दाब वाढल्यानेही (ग्लाकोमा) डोकेदुखी होऊ शकते. ह्यासाठी डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊन तपासणी करणे गरजेच. काचबिंदूमुळेही डोकेदुखी चालू होते. त्यासाठी मधुमेह व रक्तदाबाचीही चाचणी करावी.

WD
तोंडाचे आजार
दातांना इजा जाली किंवा दात किडले तरीही तीव्र कळा दातातून येतात. जिभेला व हिरडीला आतून सूज येते. त्यासाठी फॉलिक अ‍ॅसिड व बी 12 घेरे अत्यंत गरजेचे आहे तसेच त्या ठिकाणी.. पासून अनेक प्रचलित औषधे लावल्यास तात्काळ डोकेदुखीही कमी होऊन आराम पडू शकतो. मेंदूत रक्तस्त्राव किंवा रक्ताची गुठळी झाल्यास डोकेदुखी वाढते. अचानक डोकेदुखी वाढणे, वस्तू डबल दिसणे किंवा तोंड वाकडे होते, वाचा बसणे ही लक्षणे धोकादायक असू शकतात. अचानक उलट्या होणे किंवा फिट्स येण्याचे प्रकारही वाढतात. अवघड जागेत गुठळी गेल्यास मृत्यू ओढवू शकतो. कधी कधी मलेरिया किंवा आमांशाचे जंतूही मेंदूत जाऊन बसतात व त्यामुळेही वरीलप्रमाणे लक्षणे दिसू शकतात. त्यातून मेंदूचा कॅन्सर होऊ शकतो.

WD
मेंदूच्या वेगवेगळ्या तपासण्या तसेच सिटीस्कॅन, एमआरआय करणे गरजेचे. ही कारणे वृद्धत्वात जादा असतात. परंतु अपघात झाल्यास व डोक्यास मुका मार बसल्यास काही दिवसांनी किंवा काही महिन्यांनी डोकेदुखी सुरू झाल्यास ताबडतोब मेंदूची तपासणी करणे फार महत्वाचे. गंभीर परिस्थिती उत्पन्न झाल्यास व मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यास काही वेळा शस्त्रक्रिया करावी लागते.

वेबदुनिया वर वाचा