घ्या संतुलित आहार

मानवाच्या शारीरीक व मानसिक आरोग्यासाठी शरीराला पौष्टीक आहाराची आवश्यकता असते. पौष्टीक आहार कमी किंवा अधिक प्रमाणात मिळाला तरीही त्याचा दुष्परिणाम शरीरावर होतो. म्हणून निरोगी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी संतुलित आहाराची आवश्यकता आहे.

व्यक्तीचे वय, लिंग, उंची, शारीरीक क्षमता आणि वजनानुसार संतुलित आहाराची आवश्यकता असते. या आहारात कॅलरीज, प्रोटीन, लोह व जीवनसत्वे विशिष्ट प्रमाणात असतात. संतुलित आहार घेतल्यावर त्यामध्ये पौष्टीक घटकाचा समावेश आहे की नाही हे समजावून घेतले पाहिजे. कारण अन्नात पौष्टीक घटकांसोबत पोषणमुल्य नसलेल्या घटकांचा समावेश असू शकतो, जो शरीराला हानीकारक असतो. त्यामुळे या अपौष्टीक घटकांचीही माहिती असणे आवश्यक आहे.

पोषक नसलेले मुख्य घटक खालील प्रमाणे आहेत. ट्रिप्सीन इनहीबिटर हा पदार्थ सोयाबीन, राजमा, बालोर आणि अंड्याचा पांढरा भाग यामध्ये असतो. या खाद्यपदार्थात असलेले प्रोटीन अमिनो एसिड ट्रिप्सीन पचनशक्ती आणि कार्यक्षमता कमी करतात. परंतु, अधिक तापमानात उकळल्यास हा घटक नष्ट होतो आणि खाद्यपदार्थात असलेले टिप्सिन अमीनो एसिड जे पचनशक्ती आणि कार्यक्षमता वाढवते ते सहजपणे रक्तात मिसळले जाते.

फाइटेट नावाचा घटक ज्वारी, बाजरीत मोठ्या प्रमाणात असतो. या अन्नातील कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक आणि लोह यासारख्या पौष्टीक घटकांना अध‍िक घट्ट बनविले जाते. ज्यामुळे वरील घटकांचे शरीरात शोषण योग्य पद्धतीने होत नाही. यासाठी अंकुरित अन्नधान्याचा उपयोग करून खाद्यपदार्थातील फाइटेट कमी केले जाऊ शकते. म्हणूनच लहान मुलांसाठी अंकुरित केलेल्या धान्याच्या पिठाचा उपयोग करण्यास सांगितले जाते.

टॅनिन हे बहुतेक हिरव्या भाज्या, मसाले आणि बाजरीत सापडते. टॅनिनचा संयोग लोहाशी झाल्यामुळे लोहाचे शरीरात पचन होत नाही. वरील खाद्यपदार्थांबरोबर लिंबू, चिंच किंवा दह्याचा उपयोग केल्यास टेनिनचे प्रमाण कमी होते. याच कारणामुळे आहारात पालक, मेथी व अन्य हिरव्या भाज्यांचा उपयोग अधिक प्रमाणात केल्यामुळे शरीराला लोह मिळू शकत नाही. परंतु, हिरव्या भाज्यांबरोबर कोणताही आंबट खाद्यपदार्थ जसे टोमॅटो, लिंबूसेवन केल्यास शरीरात सहजपणे लोह शोषले जाते. आणि रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाणही वाढते.

फायबर- पदार्थांध्ये पचन न होणार्‍या कार्बोहायड्रेड्सला फायबर असे म्हटले जाते. कॉम्प्लेक्स फायबरचे एंजाइम्सद्वारे पचन होत नाही आणि मलपृष्ठाद्वारे बाहेर पडतात. कॉम्पेलेक्स फायबर मधुमेह, ह्दयरोग, लठ्ठपणा, रक्तदाब आणि कर्करोगासारख्या आजाराला कमी करण्यास मदत करतो.

वरील बाबी लक्षात ठेवून जर संतुलित आहार घेतला तर आपण नक्कीच मानसिक व शारीरीकदृष्ट्या स्वस्थ राहू शकाल.

वेबदुनिया वर वाचा