भद्रा म्हणजे काय?

What is Bhadra in Astrology धार्मिक ग्रंथानुसार भद्रा ही शनिदेवाची बहीण आणि भगवान सूर्य आणि माता छाया यांची संतान आहे. पौराणिक कथेनुसार भद्राचा जन्म राक्षसांचा नाश करण्यासाठी झाला होता. जेव्हा भद्राचा जन्म झाला, जन्म घेतल्यानंतर लगेचच तिने संपूर्ण विश्वाला आपला घास बनवायला सुरुवात केली. अशा रीतीने जेथे जेथे शुभ व मांगलिक कार्य, यज्ञ व विधी केले जात होते तेथे भद्रामुळे विघ्न येऊ लागले. या कारणास्तव जेव्हा भद्रा असते तेव्हा कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. 11 करणांमध्ये भद्राला 7व्या करणात म्हणजेच विष्टि करणमध्ये स्थान मिळाले आहे.
 
वैदिक पंचाग गणनेनुसार, भद्रा तीन लोकांमध्ये वास करते. म्हणजे भद्रा स्वर्गात, पाताळात आणि पृथ्वीत वास करते. जेव्हा चंद्र कर्क, सिंह, कुंभ आणि मीन राशीत असतो. तेव्हा भद्रा पृथ्वीवर राहते. जेव्हा भद्रा पृथ्वीलोकात राहते तेव्हा भद्राचे मुख समोर असते. अशा स्थितीत या काळात कोणत्याही प्रकारचे शुभ आणि मांगलिक कार्य करण्यास मनाई आहे. भद्रामध्ये केलेले शुभ कार्य कधीच यशस्वी होत नाही. पौराणिक कथेनुसार, भद्रकालातच रावणाच्या बहिणीने राखी बांधली होती, त्यामुळे रामाच्या हातून रावणाचा नाश झाला. 
 
हिंदू धर्मात शुभ कार्य करताना भद्रकाळ याची विशेष काळजी घेतली जाते. भद्र काळात कोणतेही शुभ कार्य सुरू होत नाही आणि संपत देखील नाही. यामागे एक पौराणिक समज आहे की, भद्राचा स्वभाव क्रोधी आणि संतप्त आहे. भद्राच्या स्वभावामुळे देवांनी तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. तेव्हा ब्रह्माजींनी भद्राच्या प्रकृतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पंचांगाच्या विशिष्ट वेळेचा एक भाग भद्राला दिला. भद्र काळात केलेल्या कामात अनुचित घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे भद्र काळात मुंडण करणे, गृह प्रवेश करणे, लग्नकार्य, पूजाविधी इत्यादी कामे अशुभ मानली जातात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती