सगळ्यात आधी घराला निसर्गानुरूप बनवा. याचा अर्थ निसर्गात असणार्या प्रत्येक घटकाचे संतुलन व्यवस्थित असायला हवे. म्हणजे भूमी, जल, जंगल, आग सगळ्याचेच संतुलन हवे. घरात पाण्याचे प्रतीक म्हणून एक्वेरीअम ठेवा किंवा निळे पडदे लावा. एक्वेरिअम ठेवल्याने घरात शांती राहते. आगीचे संतुलन योग्य रहावे यासाठी संध्याकाळी घरात दिवा अवश्य लावावा.