MahaTransco Recruitment 2023: महाराष्ट्र राज्य वीज पारेषण विभागात 3129 पदांसाठी भरती

शुक्रवार, 30 जून 2023 (11:18 IST)
महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी मध्ये कार्यकारी संचालक (प्रकल्प), मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण) महाव्यवस्थापक (वित्त व लेखा), कार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), उपकार्यकारी अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (पारेषण), सहाय्यक अभियंता (दूरसंचार), वरिष्ठ तंत्रज्ञ (ट्रान्स सिस्टम) तंत्रज्ञ-I (ट्रान्स सिस्टम), तंत्रज्ञ-II (ट्रान्स सिस्टम), सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य), सहायक तंत्रज्ञ (सामान्य), टंकलेखक (मराठी) या पदांसाठी भरती होणार असल्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 जुलै 2023 आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. 
 
पदांचा तपशील -
कार्यकारी निदेशक
मुख्य अभियंता (ट्रांसमिशन)
अधीक्षण अभियंता (ट्रांसमिशन)
महाप्रबंधक (वित्त एवं लेखा)
कार्यकारी अभियंता (ट्रांसमिशन)
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ट्रांसमिशन)
उप कार्यकारी अभियंता (ट्रांसमिशन)
सहायक अभियंता (ट्रांसमिशन)
सहायक अभियंता (दूरसंचार)
वरिष्ठ तकनीशियन (ट्रांस सिस्टम)
तकनीशियन- I (ट्रांस सिस्टम)
तकनीशियन- II (ट्रांस सिस्टम)
सहायक तकनीशियन (सामान्य)
सहायक तकनीशियन (सामान्य)
टाइपिस्ट (मराठी)
एकूण 3129 पदांसाठी ही भरती आहे. 
 
पात्रता- 
या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार संबंधित पदानुसार डिप्लोमा, 12 वी किंवा पदवीधर असावे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून पदवी घेणे अनिवार्य आहे. 
उमेदवाराला पदाचा अनुभव असावा. 
सर्व अटी आणि शर्थी असणं आवश्यक आहे.
 
आवश्यक कागदपत्रे- 
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीचे प्रमाणपत्र 
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट अर्ज फोटो
 
मह्त्त्वाच्या तारखा- 
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 19 जुलै 2023 आहे. 
 
अर्ज कुठे पाठवायचे -
शासकीय मुख्य महाव्यवस्थापक (एचआर), महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड, प्रकाशगंगा, ई-ब्लॉक, प्लॉट नंबर, सी-19, 7 वा मजला, एचआर विभाग, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (ई), मुंबई-400051. {कार्यकारी संचालक (प्रकल्प), मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण), महाव्यवस्थापक (वित्त व लेखा), टंकलेखक (मराठी) पदांसाठी
उमेदवाराने या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
 

Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती