* ई कॉमर्स वेबसाईट्सच्या मदतीने व्यवसाय वाढवला जातोय. फेसबुक, ट्विटरवर अनेक ब्रँड्सची स्वतंत्र पेजेस आहेत. अनेक व्यवसाय, व्यवहार सोशल नेटवर्किंग द्वारे किंवा ऑनलाईन होतात. टेकसेव्ही तरुणांना या क्षेत्रात बरीच मोठी मजल मारता येईल.
* या क्षेत्रातील करीअरसाठी काही कौशल्यं अंगी बाणवणं गरजेचं आहे. मुख्यत्वे तुम्हाला माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची चांगली जाण असायला हवी. वेब डिझायनिंगचा कोर्स केला असेल तर उत्तम. तसंच कल्पकता, नवं शिकण्याची तयारी या गोष्टीही गरजेच्या आहेत. मार्केट रिसर्च, ऑनलाईन जाहिरात, ब्रँडिंग, मिडिया प्लॅनिंग याची माहिती असणंही गरजेचं आहे.