अशी माझी सायकल, माझी होती सखी सहेली!!
शुक्रवार, 3 जून 2022 (11:12 IST)
असायचीत मोठे भावंडआपल्या लहानपणी
त्यांनी वापरलेली असायची सगळी खेळणी,
आपण त्याचं खेळण्यांशी खेळायचं,
पण आनंदात काही कमी नाही पडायचं,
पहिली ओळख, तीन चाकी सायकली शी,
सवय मागं कुणी ना कुणी असण्याची,
नवीन नव्हती ना ती दम पकडणार कित्ती,
हँडल तुटून वेगळं पडलं, आमची फजिती,
मग काही आपल्यासाठी बुवा सायकल नव्हतीच,
घरी एक होती, तीच होती आम्हा सर्वांचीच,
अंगात हुरूप आला, आपण ही शिकावी,
जेंव्हा हातात येई, तेव्हा चालवून बघावी,
झाली पडझड, ढोपर कित्तीदा फुटलं,
पण सायकल शिकायचं वेड मनातून नाही गेलं,
शेवटी आलीच की चालवता सायकल मस्त,
पंखच लागलें होते जणू, विहार नभात,
एके दिवशी मात्र स्वतःची अशी मिळाली नवीनच,
मी तर उडलेच आनंदाने, स्वप्न उतरले सत्यातच,
कॉलेज पर्यंत साथ तिनं ही इमानदारीने निभावली,
अशी माझी सायकल, माझी होती सखी सहेली!!
...अश्विनी थत्ते