किमान २४ तास पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्याचा कालावधी लागतो. तसेच पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ३६५ दिवस लागतात. आपण या ३६५ दिवसांच्या कालावधीला एक वर्ष म्हणतो. पृथ्वी तिच्या स्वतःभोवती फिरण्याच्या आसापासून २३.५ अंशांनी कललेली आहे आणि ती याच स्थितीत स्वतःभोवती व सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करते म्हणूनच पृथ्वीवर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे ऋतुचक्र सुरू असते.