सापेक्षतेचा सिद्धांत मांडणार्या E=MC2 या त्यांच्या प्रसिद्ध समीकरणावरच कालांतराने अणूचे विभाजन करण्यात शास्त्रज्ञांना यश आले. 1921 मध्ये पदार्थविज्ञान शास्त्रातील संशोधनाबद्दल आईन्स्टाईन यांना नोबेल पारितोषिक मिळाले. विज्ञान म्हणजे निसर्ग व मानव यांना जोडणारा दुवा असे मानणारा शांततावादी शास्त्रज्ञ म्हणून सारे जग या थोर वैज्ञानिकाला ओळखते.