भारत आणि श्रीलंका मालिकेवर कोरोनाचे सावट,13 जुलै नव्हे तर या तारखेला पहिला वनडे खेळला जाणार
शनिवार, 10 जुलै 2021 (12:48 IST)
भारत आणि श्रीलंका यांच्यात 13 जुलैपासून सुरू होणार्या मर्यादित षटकांच्या मालिकेत कोरोनाने ब्रेक लावले आहे.श्रीलंकेचा फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर आणि डेटा विश्लेषक जी.टी. निरोशन यांच्या कोविड -19 चे अहवाल सकारात्मक आल्यावर मालिकेचे वेळापत्रक बदलले आहे.13जुलै रोजी खेळला जाणारा पहिला एकदिवसीय सामना आता 17 जुलै रोजी होणार आहे.
या दौर्यावर भारताला तीन एकदिवसीय मालिका आणि तीन टी -20 सामन्यांची मालिका खेळायची आहे.विराट कोहली, रोहित शर्मा या ज्येष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत शिखर धवनला या दौर्यावर कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
श्रीलंकेचा फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर आणि डेटा विश्लेषक जीटी निरोशन यांनी ब्रिटनहून परत आल्यानंतर त्यांचा कोविड -19 चाचणीचा अहवाल सकारात्मक आला आहे.त्यामुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डाला तीन दिवसांसाठी कठोर विलगीकरणाचे पाउल घ्यावे लागले.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मालिकेचे वेळापत्रक निश्चित केल्याबद्दल पीटीआयला सांगितले.की,ही मालिका आता 13 जुलै ऐवजी 17 जुलै रोजी सुरु होणार आहे.हा निर्णय खेळाडूंच्या सुरक्षेचा विचार करून श्रीलंका क्रिकेटशी चर्चा करुन घेण्यात आला आहे.
श्रीलंका क्रिकेटमधील सूत्रांशी बोलल्यानंतर हे कळले आहे की बीसीसीआयशी चर्चा केल्यानंतर नव्या तारखांवर अद्याप चर्चा सुरू आहे.50 षटकांच्या सामन्यांच्या तारखा 17,19 आणि 21जुलै होण्याची शक्यता आहे, तर तीन सामन्यांची टी 20 मालिका 24 जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
श्रीलंका बोर्डाच्या एका सूत्रांनी सांगितले की, “आम्ही कार्यक्रमाच्या नवीन तारखेस काही पर्यायांवर चर्चा करीत आहोत.” पूर्व निर्धारित नियोजनानुसार या मालिकेची सुरुवात 13 जुलै रोजी एकदिवसीय टप्प्यापासून होणार होती आणि याचे 2 सामने 16 जुलै आणि 18 जुलै रोजी होणार होते.टी -20 आंतरराष्ट्रीय सामने 21, 23 आणि 25 जुलै रोजी होणार होते.
शिखर धवन यांच्या नेतृत्वाखालील दुसर्या दर्जाच्या भारतीय संघाने आपले कठोर विलगीकरण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.आणि दल कोलंबोमध्ये प्रशिक्षण घेत आहे.श्रीलंका बोर्डाच्या सूत्रांनी सांगितले की ब्रिटनहून परतलेले सर्व श्रीलंकेचे खेळाडूंच्या कोरोना चाचणीचेअहवाल नकारात्मक आले आहे.