भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. मात्र, तिच्या पोस्टबद्दल ती अनेकदा चाहत्यांकडून ट्रोल होत असते. साराने नुकताच तिच्या इंस्टाग्रामवर एक नवीन फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती एका रेस्टॉरंटमध्ये बसली आहे. तिने ब्लॅक अँड व्हाईट कलरची स्कीव्ही परिधान केली आहे आणि तिने आपले केस पोनीटेल बनविले आहेत. साराचा हा फोटो बर्याच जणांना आवडला आहे आणि तिच्या लूकचे कौतुकही केले आहे. मात्र काही यूजर्संनी फोटो आणि टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिलला जोडून ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
साराने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'अरे सीरी, माझे जेवण कुठे आहे?' चाहत्यांनी साहाबरोबर मस्ती करायला सुरुवात केली आणि ट्रोल करण्यास सुरुवात केली. सारा तेंडुलकरने या पोस्टवर यूजर्संने लिहिले की, 'शुभमन लवकरच जेवण आणेल.' त्याचवेळी दुसर्या यूजरने लिहिले, 'शुभमन गिलच्या घरी भोजन उपलब्ध होईल.'