दरम्यान यंदाच्या हंगामातील खेळाडूंचा लिलाव येत्या १२ व १३ फेब्रुवारीला होणार आहे. तत्पूर्वी या लिलावासाठीची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये सत्यजित बच्छावची निवड झाली आहे. सध्या ३४० भारतीय खेळाडूंसह १४ सहयोगी देशातील २२० खेळाडू मिळून ५९० क्रिकेटपटुंवर बोली लागणार आहे. दहा संघानी खेळाडूंची पसंती दर्शविल्यानंतर गेल्या महिन्यात जारी करण्यात आलेली आधीची १२१४ खेळाडूंची यादी कमी करून ती ५९० पर्यंत आली आहे.