ही घटना बांगलादेशच्या डावाच्या 18 व्या षटकात मोहम्मद सैफुद्दीन स्टाइकवर असताना घडली. पुलशॉट खेळताना सैफुद्दीनने जेव्हा स्टंपवर 'किक मारली', तेव्हा त्याने मागे वळून बघितले की नेमकं काय झालं कारण त्याने बेल्स पडल्याची आवाज ऐकली. पण बांगलादेशी फलंदाज खरोखरच हिट-विकेट होते का? जेव्हा हे तपासण्यासाठी फुटेज स्कॅन केले गेले तेव्हा असे दिसून आले की बेल्स जागेवरुन वार्याने हळू हळू खाली पडले आहेत.