गेलचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

बुधवार, 26 ऑगस्ट 2020 (09:31 IST)
यपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाबचा सलामीवीर ख्रिस गेल याच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जमैकाचा धावपटू आणि आॅलिम्पिक पदक विजेता उसेन बोल्टच्या पार्टीत गेलने हजेरी लावली होती. या पार्टीनंतर बोल्टचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त पसरले होते. मात्र गेलने शनिवारी दोनवेळा कोरोना चाचणी करवून घेतली. दोन्ही चाचण्यांचा अहवाल सोमवारी निगेटिव्ह आला. गेलने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही माहिती दिली.
 
बोल्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर स्वत:च्या घरी क्वारंटाईन झाला. बोल्टने इंग्लंडचा स्टार रहीम स्टर्लिंग याच्यासह अनेक दिग्गजांना आपल्या ३४ व्या वाढदिवसाच्या पार्टीला निमंत्रित केले होते.यावेळी कुणीही मास्क लावून नव्हते, शिवाय शारीरिक नियमांचे देखील पालन करण्यात आले नाही. गेलचा अहवाल पॉझिटिव्ह आला असता तर त्याला यूएईसाठी प्रवास करता आला नसता. ४० वर्षांच्या गेलला किंग्स पंजाबने २०१८ ला दोन कोटी रुपये मोजून स्वत:च्या संघात घेतले होते.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती