दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघात मोठा बदल, हेझलवूडच्या जागी या युवा गोलंदाजाला संधी

शुक्रवार, 17 डिसेंबर 2021 (14:39 IST)
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारपासून अॅशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. अॅडलेडमध्ये होणाऱ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघात मोठा बदल करण्यात आला आहे. सामन्याच्या पूर्व पत्रकार परिषदेत माहिती देताना ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने सांगितले की, दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज जोस हेझलवूडच्या जागी झ्ये रिचर्डसनचा संघात समावेश करण्यात आला आहे. डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या कसोटीतही संघाचा भाग असेल. हेझलवूडने गाब्बा येथील पहिल्या कसोटीदरम्यान पाठदुखीची तक्रार केली होती. ब्रिस्बेनमध्ये कसोटी सामना संपल्यानंतर कर्णधार कमिन्सने सांगितले की, हेझलवूडला पाठदुखीचा त्रास होत असून त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवले जात आहे. 
25 वर्षीय वेगवान गोलंदाज झ्ये रिचर्डसनला दोन कसोटी सामन्यांचा अनुभव आहे. या कालावधीत त्याने 20.50 च्या सरासरीने सहा विकेट्स घेतल्या आहेत. त्याने फेब्रुवारी २०१९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. नुकत्याच झालेल्या शेफिल्ड शील्ड स्पर्धेत त्याने 13.4 च्या सरासरीने 23बळी घेतले आणि 37 धावा केल्या.        
डेव्हिड वॉर्नर तंदुरुस्त असणे ही संघासाठी मोठा दिलासा देणारी बाब आहे. पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 94 धावा केल्या पण त्यानंतर त्याला दुखापत झाली, पण आता तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. 
 
ऑस्ट्रेलियन प्लेइंग इलेव्हन:
डेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स (क), मिशेल स्टार्क, झ्या  रिचर्डसन, नॅथन लायन
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती