क्रिकेटमधील टर्बोनेटर हरभजन सिंहला पंजाब पोलिसांत पदोन्नती मिळाली असून तो एसएसपी बनला आहे. बर्नाला येथे तो पंजाब पोलिस मुख्यालयात रिपोर्ट करेल.
PR
नवीन जबाबदारी मिळाल्यानंतर खूशीत असलेला हरभजन सांगतो की, हा सन्मान व जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू.
हरभजन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शंभर कसोटी खेळला असून ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेत तो भारतीय फिरकी मार्याचे नेतृत्व करत आहे. एकेकाळी त्याने याच ऑस्ट्रेलियन्सना फिरकीच्या इशार्यावर नाचवत 'टर्बोनेटर' ही उपाधी प्राप्त केली होती. (वृत्तसंस्था)