अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेनन यांच्यात प्रेम बहरत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड वर्तुळात रंगताना दिसत आहेत. ही जोडी राबता या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला मात्र त्यानंतर ही जोडी चांगलीच चर्चेत आली. दोघे अनेकदा एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसले. अलीकडेच कृतीला पुन्हा एकदा सुशांतच्या घराजवळ पाहिले गेले. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या नात्याची चर्चा होऊ लागली आहे.