टीव्हीवर काही मालीका अशा असतात की, त्या प्रेक्षकांना सतत आवडतात आणि आपल्याकडे खिळवून ठेवतात यापैकीच एक मालिका म्हणजे स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते ही मालिका होय. या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिका अत्यंत चांगल्या प्रकारे निभावल्या. त्यामुळे सर्वांनाच ही मालिका विशेष आवडते. त्यातच अरुंधतीची भूमिका साकार करणारी मधुराणी प्रभुलकर यांचे काम सर्वांना आवडते.
सध्या ही मालिका एका नव्या आणि निर्णयक वळणावर आली आहे. पण यासोबतच मालिकेतील मुख्य अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर म्हणजेच अरुंधतीने मालिका सोडल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. मात्र मधुराणी हीने मालिका सोडली नसून तिने काही काळासाठी मालिकेतून ब्रेक घेतला आहे. विशेष म्हणजे ब्रेकनंतर ती पुन्हा शूटिंगला सुरुवात करणार आहे. या मालिकेत मधुराणी प्रभुलकर आईची म्हणजेच अरुंधतीची भूमिका साकारत असून तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो प्रसारित झाला आहे. त्या प्रोमोमध्ये अनिरुद्ध आणि संजना यांच्यासोबत घरातील इतर सदस्य दिसत आहेत. मात्र अरुंधतीचा कोणताही सहभाग दिसत नाही.
महत्त्वाचे कारण म्हणजे अरुंधतीने म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने काही वैयक्तीक कारणासाठी मालिकेतून काही दिवसांचा ब्रेक घेतल्याने निर्मात्यांनी आता अनिरुद्ध आणि संजनावर फोकस केला आहे. दरम्यान मालिकेमध्ये अरुंधती दिसत नसल्याने तिने मालिका सोडली की काय असा संभ्रम प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला होता. सोशल मीडियावर अशा चर्चा देखील सुरू होता. प्रत्यक्षात मात्र तसे घडलेले नाही.