ठाकुर अनूपसिंग हे नाव आपल्यासाठी काही नवीन नाही. मिस्टर वर्ल्ड विजेता ठाकुर अनूपसिंग आपल्या मराठीतल्या पहिल्या वहिल्या पर्दापणास सज्ज झाला आहे. अनूप अशोक जगदाळे दिग्दर्शित आगामी 'बेभान' या सिनेमात ठाकुर अनूपसिंगचा मराठमोळा अंदाज पाहता येणार आहे. सिंघम -3 या तेलगू तर कमांडो 2 या हिंदी अशा आगामी सिनेमांमध्ये ठाकुर अनूपसिंग झळकणार आहे. दिग्दर्शक अनूप अशोक जगदाळे यांच्या 'बोभाटा' या सिनेमाची चर्चा सिनेवर्तुळात जोरदार चालू आहे. मधूकर (अण्णा) उद्धव देशपांडे हे निर्माते असून सह निर्माते प्रसाद देशपांडे आहेत. दिनेश देशपांडे यांनी सिनेमाची कथा लिहिली आहे.