अभिनेत्री उर्मिला कोठारे यांच्या वेगवान कारने मजुरांना चिरडले, एकाचा मृत्यू 1 जखमी

शनिवार, 28 डिसेंबर 2024 (18:07 IST)
Urmila Kothare: अभिनेत्री उर्मिला कोठारे यांच्या कारचा अपघात झाला असून वेगवान कारने मजुरांना चिरडले असून एकाचा मृत्यू झाला तर एक जखमी झाला आहे. या अपघातात कारचालक आणि अभिनेत्रीला गंभीर दुखापत झाली आहे. हा अपघात कांदिवली परिसरात शनिवारी पहाटे अभिनेत्री चित्रपटाचे शूटिंग संपवून घरी परत असताना घडला.

वेगवान कारने कांदिवली पूर्व येथे पोईसर मेट्रो स्टेशन अंतर्गत मेट्रो रेल्वेची कामे करत असताना धडक दिली. त्यात एका मजुराचा मृत्यू झाला तर एक मजूर गंभीर जखमी झाला. अभिनेत्री कारचे एअरबॅग्स योग्य वेळी उघडल्यामुळे थोडक्यात बचावली. या प्रकरणी अभिनेत्रींच्या कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे. वाहनाचा चालक वेगाने वाहन चालवत असून त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. 

अभिनेत्री उर्मिला कोठारे या दिगदर्शक महेश कोठारे यांची सून असून आदिनाथ कोठारे यांच्या पत्नी आहे. अभिनेत्रीने दुनियादारी, शुभमंगल सावधान, ती सध्या काय करते, आणि थँक गॉड  या चित्रपटात काम केले आहे. 
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती