पेटीएमसह सर्व ई- वॉलेट स्टेट बँकेकडून ब्लॉक

नवी दिल्ली- नोटबंदीनंतर कॅशलेस होण्यासाठी सर्वसामान्यांनी मोठ्या प्रमाणावर आपलेसे केलेले पेटीएम, मोबिक्विक, एअरटेल मनीसह सर्व ई- वॉलेट्स स्टेट बँक ऑफ इंडियाने अचानक ब्लॉक केले आहेत. आता स्टेट बँकेच्या खात्यावरून या वॉलेटसमध्ये पैसे ट्रान्सफर करता येणार नाहीत. त्यामुळे खातेदारांचे वांधे होणार आहेत.
 
स्टेट बँकेने या प्रकरणी रिझर्व्ह बँकेंकडे खुलासाही केला आहे. ई वॉलेटसच्या माध्यामतून बँकेच्या अनेक ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव व ग्राहकांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. मात्र, पेटीएमवर आणलेली ही बंदी तात्पुरती आहे. सुरक्षाविषयक खबरदारीनंतर ती हटविली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा