पी एम सी बँक घोटाळा : एम डी जॉय थॉमस कडे पुण्यात नऊ आलिशान फ्लॅटस

मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019 (10:09 IST)
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक (PMC) बँक घोटाळा प्रकरणात आणखी एक सर्वात  मोठा तपास समोर आला असून, मुख्य आरोपींपैकी माजी एमडी जॉय थॉमस याच्या संपत्तीचा आर्थिक गुन्हे शाखेला तपास लागत आहे. या तपासात मोठे आर्थिक व्यवहार उघड होत असून, त्याने 2012 पासून कोंढवा, पुणे शहरात 9 आलिशान महागडे फ्लॅट सोबतच 1 दुकान खरेदी केले असून, थॉमस याने ही मालमत्ता दुसऱ्या पत्नीच्या साथीने खरेदी केली होती.
 
पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी चौघांना अटक केली आहे. आता आर्थिक गुन्हे शाखेने त्यांची मालमत्ता जप्ती सुरु केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने प्रकरणाची चौकशी केली असता असे समोर आले की, सर्व मालमत्ता 2012 नंतर खरेदी करण्यात आल्या आहेत. हे त्याच वेळी घडले जेव्हा एचडीआयएल आरोपी राकेश आणि सारंग वाधवन यांनी कर्जाची परतफेड करणे थांबवले होते आणि अधिका अधिक  रक्कम कर्ज घेत होते.
 
मालमत्तांच्या खरेदीचे उत्पन्नाचे स्रोत थॉमस त्याची दुसरी पत्नी च्या मालकीची आहे. सध्या याविषयीची माहिती सविस्तरपणे गोळा केली जात आहे. थॉमसने आपल्या असिस्टंटशीश लग्न केले असून, त्याने इस्लाम धर्म स्वीकारला व नाव जुनैद खान ठेवले आहे. तर पुण्यातील सर्वच मालमत्ता जुनैद आणि पत्नीच्या बदललेल्या नावाने आहेत.
 
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) एचडीआयएलच्या सुमारे 2100 एकर जागेची (किंमत सुमारे 3500 कोटी) एचडीआयएलचे अध्यक्ष राकेश वाधवन आणि त्याचा मुलगा सारंग वाधवन यांचे 60 कोटी रुपयांचे खासगी जेट व दागिने जप्त केले आहेत. ईडीने पीएमसी बँकेचे माजी अध्यक्ष वरमसिंह यांची बँक खातीही गोठविली आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती