आता हेल्मेट घातलेलं असतानाही 2000 रुपयांचं चलान

गुरूवार, 19 मे 2022 (14:32 IST)
दिल्ली- दुचाकी चालवतांना हेल्मेट नसल्यास वाहतूक पोलिस जवळपास 500 रूपये दंड ठोठवला जात होता. मात्र आता हेल्मेट असतानाही दुचाकी चालकांना तब्बल 2000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. नव्या वाहतूक धोरणानुसार दुचाकी चालवीताना चालकांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे, अन्यथा त्यांना भारी दंड भरावा लागणार आहे.
 
नव्या वाहतूक नियमानुसार हेल्मेट असतानाही 2 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. नव्या धोरणानुसार जर तुम्ही दुचाकी चालवत असाल आणि तुमच्या डोक्यावर हेल्मेट असेल आणि त्याची स्ट्रिप तुम्ह बांधली नसेल तर नव्या नियमानुसार 194 डीएमव्हीऐ नुसार तुम्हाला एक हजार रूपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. जर वाहनचालकाने दोषपूर्ण हेल्मेट म्हणजेच आयएएसआय मार्क नसलेले घातले तर नवा वाहतूक कायद्यानुसार एक हजार रूपयांचा दंड तुम्हाला भरावा लागू शकतो. यामुळे जर तुम्ही हेल्मेट घातले असतांनाही तुम्हाला 2 हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती