Hurun India Rich List 2023 : इंडिया श्रीमंत यादीत लोकप्रियतेत रतन टाटा यांचे स्थान अव्वल

मंगळवार, 10 ऑक्टोबर 2023 (19:29 IST)
Hurun India Rich List 2023: हुरून इंडिया आणि 360 वन वेल्थ हुरून इंडिया रिच लिस्ट 2023 आज जाहीर करण्यात आली असून या यादीत उद्योगपती मुकेश अंबानी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या व्यतिरक्त प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनाही मानाचे स्थान मिळाले आहे.   

ते आनंद महिंद्रा यांना मागे टाकत सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केले जाणारे भारतीय उद्योगपती बनले आहे. हुरून इंडिया रिच लिस्ट 2023 प्रमाणे रतन टाटा यांचे भारतातील व्यवसाय जगात सर्वाधिक फॉलोअर्स आहे. 
 
हुरून इंडिया रिच लिस्ट 2023 अनुसार प्रसिद्ध उद्योजक 84 वर्षीय रतन टाटा यांचे सोशल मीडियावर  X वर 12.6 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.त्यांनी सोशल मीडियावर आनंद महिंद्रा यांना मागे सोडले आहे. आनंद महिंद्रा यांचे 10.8 दशलक्ष फॉलोअर्स आहे. 
 
700 कोटी रुपयांच्या संपत्तीसह अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यंदाच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचले आहेत. याशिवाय कुमार मंगलम बिर्ला आणि नीरज बजाज भारतातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत परतले आहेत. त्यांनी विनोद अदानी आणि उदय कोटक यांना पराभूत करून यादीत पुनरागमन केले आहे. 

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी 10 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या 360 वन वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 च्या नवीनतम संपत्ती क्रमवारीत अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना मागे टाकले. गेल्या वर्षीच्या तुलनेत अंबानींची संपत्ती 2% ने वाढून ₹808,700 कोटी झाली आहे.
 



Edited by - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती