ज्या व्यापार्यांनी जीएसटी रिटर्न्स-1 आणि जीएसटी रिटर्न्स-3बी मध्ये वेगवेगळी देयके दाखवली आहेत, त्या सर्व व्यापार्यांना नोटीस पाठवली जाऊ शकते. ज्या लोकांनी दोन्ही रिटर्न्स फायलिंगमध्ये मोठे अंतर ठेवले आहे, त्यांच्यावर विशेष नजर ठेवण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 'संशयास्पद' करदात्यांची माहिती राज्यांना दिली जाणार आहे, जेणेकरून या करदात्यांवर कारवाई करता येईल.